आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:गोदा प्रदूषण रोखण्यात बिबट्याचा अडथळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्र परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याने येथे जाण्यास कर्मचाऱ्याना भीती वाटत असल्यान गोदावरीचे प्रदूषण राखण्यात आता बिबट्याचाही अडथळा येत असल्याची एकच चर्चा सर्वत्र सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांना या परिसरात दोन वेळा बिबट्या दिसल्याने महापालिकेने वनविभागाकडे तक्रार केली आहे. पिंपळगाव खांब परिसरातील वालदेवी नदीकाठच्या नवीन मलनिस्सारण केंद्राची देखभाल दुरुस्ती तसेच नियमित आॅपरेशनही ठेकेदाराकडे आहे. हे काम बघण्यासाठी ठेकेदाराने दिवस आणि रात्रपाळीत प्रत्येकी सहा कर्मचारी ठेवले असून सध्या या कर्मचाऱ्यांची कामे करताना त्यांची भीतीने गाळण उडत आहे.

२१ आॅक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कर्मचारी काम करीत असताना या परिसरात कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसला हाेता. कर्मचाऱ्यांनी हाती लाठ्या काठ्या घेत आरडाओरड केल्याने बिबट्या पसार झाला खरा मात्र, चार दिवसांनी अर्थातच मंगळवार २५ आॅक्टोबर रोजी मलनिस्सारण केंद्र परिसरात बिबट्याचा संचार दिसून आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. बुधवारी ठेकेदाराने ही बाब यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्रांना कळवल्यानंतर अभियंता बाजीराव माळी यांनी वनविभागाकडे याबाबतची माहिती कळविली आहे. तात्काळ बिबट्याला पकडण्याची मागणी ही केली आहे.

बातम्या आणखी आहेत...