आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू:चिमुरडीचा पित्यासमाेर कारखाली मृत्यू‎‎

सिडको‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलांना भेटण्यासाठी घरातून पळत बाहेर आलेल्या‎ १४ महिन्यांच्या चिमुकलीचा‎ कारच्या चाकाखाली आल्यावर‎ पित्याच्या डोळ्यादेखत मृत्यू‎ ‎झाल्याची दुर्दैवी घटना अंबड‎ लिंकरोड येथे घडली.‎ या घटनेत आयेजा अहमद खान‎ हीचा मृत्यू झाला. अहमद खान (विराटनगर) हे‎ त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी १५ दिवसांपूर्वीच उत्तर‎ प्रदेश येथून नाशिक अंबडलिंक रोड येथे आले होते.

एका कंपनीत कामाला जायला लागले होते. बुधवारी‎ सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान कंपनीतून घरी‎ परतल्यानंतर त्यांची मुलगी आयेजा हिने वडिलांना‎ पाहिले. तिने त्यांना भेटण्यासाठी थेट घराबाहेर धाव‎ घेतली. त्याच वेळेस रस्त्याने जाणाऱ्या कारच्या (‎ एमएच १५ एचक्यू ५६८६) चाकाखाली ती आली‎ आणि काही कळायच्या आतच तिचा मृत्यू झाला. या‎ घटनेप्रकरणी अंबड पोलिसांत कारचालक हसनेन‎ मुज्जमिल खान याच्या विरोधात गुन्हा दाखल‎ करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.‎

बातम्या आणखी आहेत...