आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियाेजन समितीच्या माध्यमातून सुरगाणा तालुक्यातील स्थानिक तर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अन्य प्रश्न साेडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून लवरकच मंत्रालयात संबंधित मंत्र्यांची बैठक घेतली जाणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अादिवासी समाजाचे नेते चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखालील सरपंच व सदस्यांच्या शिष्टमंडळास हे आश्वासन दिल्यानंतर सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समितीने िवकासासाठी गुजरातमध्ये समाविष्ट होण्यासाठी सुरू केलेले आंदोलन अखेर मागे घेतले.
दरम्यान, प्राथमिक अाराेग्य केंद्रात न थांबणाऱ्या डाॅक्टरांची चाैकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनास दिले. अादिवासी समाजाच्या शिष्टमंडळास बैठकीसाठी अामंत्रित करण्यात अाले हाेते. मात्र सभागृहातील खुर्च्यांवर अगाेदरच विविध विभागातील अधिकारी बसलेले हाेते. त्यामुळे सभागृहात दाखल शिष्टमंडळाने ‘अाम्हाला बैठकीला बाेलावले मात्र बसण्यासाठी जागा नाही, हा अादिवासींचा अपमान अाहे’ असे म्हणत बैठकीवर बहिष्कार टाकला व सभागृहातून बाहेर पडले. याचवेळी अामदार नितीन पवार यांनी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. त्यानंतर हा वाद काही प्रमाणात शमल्याचे पहायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.