आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिथे आज संपूर्ण जगात हिंसाचार होत आहे, तिथे अहिंसा हाच एकमेव उपाय मानला जातो. जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी, आयआयएफएल जिताेद्वारे महावीर जयंतीचे आैचित्य साधत शहरात पहिल्यांदाच "अहिंसा रन’चे आयाेजन करण्यात आले आहे. यात स्वच्छ, सुंदर नाशिकचा संदेशही दिला जाईल. जिताेच्या ६८ आणि २२ आंतरराष्ट्रीय चॅप्टरने आपापल्या शहरात २ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अहिंसा रन आयोजित करण्यात आल्याची माहिती जितो नाशिकचे चेअरपर्सन अॅड. सुबोध शहा, कल्पना पटणी, हर्षित पहाडे यांनी दिली.
अहिंसा रन अनंत कान्हेरे मैदान येथून सुरू होऊन ३ कि.मी. सिबल हाॅटेल, ५ कि.मी. एबीबी सर्कल, १० कि.मी. ते पुन्हा अनंत कान्हेरे मैदान अशा तीन गटात स्पर्धा हाेईल. नाशिककरांनी अहिंसा रनमथ्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जितो नाशिकच्या वतीने करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही ‘अहिंसा रन'' केवळ एक समुदायापुरती मर्यादित नसून जगभरातून अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना यात आमंत्रित करण्यात आले आहे. सर्व स्पर्धकांसाठी टी-शर्ट, मेडल आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिक माहिती सोशल मीडिया वेबसाइट www.ahimsarun.com आणि जितो चॅप्टर, बिझनेस बे, तिडके कॉलनी येथे नोंदणी करता येईल. जितो महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता ललवाणी यांनी सांगितले की, यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे नक्कीच ही एक ऐतिहासिक रन ठरणार आहे. त्याचा एक भाग व्हा आणि जगभरात शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी या कार्यात सहभागी व्हा. हिंसा ही केवळ शारीरिक नसून ती मानसिकही असू शकते आणि ती केवळ मानवजातीसाठीच नाही तर प्रत्येक जीवाशी असू शकते. प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपे आहेत. याचा प्रचार या रनमध्ये केला जाईल.
आराेग्य संवर्धन, स्वच्छतेचाही जागर
महावीर जयंतीचे आैचित्य साधत या रॅलीद्वारे अहिंसेचा संदेश देण्याबराेबर आराेग्य संवर्धन, शहर स्वच्छतेचाही जागर केला जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.