आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लठ्ठपणादिनी आरोग्य विद्यापीठाचा उपक्रम‎:अंजनेरी ट्रेकिंगद्वारे स्थुलता‎ टाळण्याचा अनाेखा संदेश‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांना‎ टाळण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करणे गरजेचे‎ असल्याचे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु‎ लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.‎ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जागतिक‎ लठ्ठपणा दिनानिमित्त अंजनेरी येथे ट्रेकिंगचे आयोजन‎ करण्यात आले होते. कुलगुरू माधुरी कानिटकर (निवृत्त)‎ समवेत प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, वित्त व‎ लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर, डॉ. मनोजकुमार मोरे,‎ अॅड. संदीप कुलकर्णी आदी अधिकारी व कर्मचारी‎ सहभागी झाले होते.

कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी‎ कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, व्यायाम‎ प्रकारांमुळे स्थूलता कमी होण्यास मदत होते. ट्रेकिंगचे‎ समन्वयक अॅड. संदीप कुलकर्णी यांनी सांगितले की,‎ जागतिक आरोग्य संघटनेने दि. ४ मार्च हा लठ्ठपणा दिन’‎ म्हणून साजरा करणेबाबत घोषित केले आहे. डॉ. सुनील‎ फुगारे, डॉ. उदयसिंह रावराणे, अॅड. संदीप कुलकर्णी, डॉ.‎ स्वप्नील तोरणे, संदीप राठोड, राजेंद्र शहाणे, योगिता‎ पाटील, डॉ. सचिन गायकवाड, रत्नाकर काळे आदी‎ शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...