आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:सिटीलिंक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने‎ हरविलेला शाळकरी मुलगा सापडला‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातील वादामुळे नववीत‎ शिकणारा एक मुलगा शाळेत न‎ जाता शालेय गणवेशातच फिरत‎ होता. हा मुलगा निमाणी‎ बसस्थानकात आला असता‎ सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यास संशय‎ आला. त्याने या मुलाची चौकशी‎ करत त्याच्या आई-वडिलांशी‎ संपर्क साधत या मुलाला‎ त्यांच्याकडे सुपूर्द केले.‎ नाशिक शहरालगतच्या‎ मखमलाबाद गावातील श्री छत्रपती‎ शिवाजी महाराज विद्यालयातील‎ इयत्ता नववीतील हा विद्यार्थी घरात‎ झालेल्या छोट्याशा वादामुळे‎ शाळेत न जाता शालेय गणवेशात‎ भटकत होता. भटकत भटकत ताे‎ मुलगा निमाणी बसस्थानकात‎ आला.

बसस्थानकाचे जागरूक‎ कंट्रोलर चंद्रकांत आव्हाड यांना‎ संशय आल्याने त्यांनी या मुलाला‎ कंट्रोल रूममध्ये बाेलावत त्याची‎ विचारपूस केली. या मुलाकडील‎ वह्या- पुस्तके बघून त्यावरील‎ शाळेचे नाव लक्षात आले.‎ त्यानुसार शाळेशी संपर्क साधून‎ मुलाच्या आई-वडिलांचा शोध‎ घेतला गेला. मुलाचे आई-वडील‎ निमाणी बस स्थानक याठिकाणी‎ आले असता मुलाला‎ सुखरूपरीत्या आई-वडिलांच्या‎ ताब्यात देण्यात आले. यावेळी‎ मुलाच्या आई-वडिलांनी‎ सिटीलिंकचे निमाणी बसस्थानक‎ प्रमुख भगवान मुंढे, वाहतूक‎ नियंत्रक चंद्रकांत आव्हाड यांचे‎ विशेष आभार व्यक्त केले.

तर‎ सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या या‎ उल्लेखनीय कार्याबद्दल श्री छत्रपती‎ शिवाजी महाराज विद्यालयाच्या‎ वतीने या सर्वांचा सत्कार करण्यात‎ आले.‎ यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,‎ उपमुख्याध्यापक व शिक्षकांच्या‎ वतीने सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या‎ कामाचे कौतुक करण्यात आले.‎ तसेच पालकांनी आपल्या मुलांची‎ काळजी घ्यावी असे आवाहन‎ देखील याप्रसंगी करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...