आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिफाड साखर कारखान्याच्या अंतर्गत असलेल्या १०८ एकर जागेवर होणाऱ्या ड्रायपोर्टच्या जागी आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्प उभा होणार असल्यामुळे या पार्कच्या माध्यमातून ड्रायपोर्टचे कामकाज सुरू राहणार असल्याने निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब आहे.
निफाड तालुक्यातील नाकाच्या १०८ एकर जागेवर २०१६ मध्ये रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्ट होणार असल्याची घोषणा केली. मात्र नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने नाकाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी ही जागा ताब्यात घेतली आहे. त्यामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (मुंबई) या संस्थेने या जागेतील काही क्षेत्र अधिग्रहित करण्याचे ठरवले असून या जमिनीचे मूल्यांकन निश्चित केले आहे. २०१८ मध्ये बँकेच्या ताब्यातील जमीन जेएनपीटीने हस्तांतरित करण्यासाठी मान्यता दिल्यानंतरही केंद्र शासनाकडून या प्रकल्पाबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. याबाबत अखेर निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे साकडे घातल्यानंतर आ. बनकर यांनी केंद्र शासनाला पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन या जागेवर आता मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क उभे होणार असल्याने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेत ३५ कोटी सेल्स टॅक्स माफ करून घेतल्याने जागेचा मार्गही मोकळा झाला होता. ही जागा खरेदी करताना संबंधित यंत्रणा ४० कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला तर ६५ कोटी जिल्हा बँकेला देणार असल्याचे समजते आहे.
राेजगार उपलब्ध होणार निफाड साखर कारखान्याच्या जागेवर ड्रायपोर्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे पत्राची दखल घेत लवकरच या जागेवर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क तयार होणार असल्याने अनेक रोजगार तालुक्यातील तरुण वर्गाला उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी निर्यातीला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे. - दिलीप बनकर, आमदार, निफाड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.