आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदू देवदेवता तसेच संताबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. याचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले हाेते. याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदायाच्या वतीने शुक्रवारी दि. १२ नाशकातील काळाराम मंदिर ते रामकुंडापर्यंत टाळ, मूंदृग वाजवत “राम कृष्ण हरी’ असा जप करत निषेध दिंडी काढली. यानंतर रामकुंड येथे गोदावरीचे तीर्थ हातात घेत ज्या पक्षात सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही अशी शपथ देखील घेण्यात आली.
सुषमा अंधारेंविरोधात राज्यभरात वारकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. याचे पडसाद नाशिकमध्ये देखील उमटले असून साधू संतांबद्दल अपमानजनक शब्द वापरल्याचा आरोप करत वारकऱ्यांनी शुक्रवारी निषेध दिंडीच्या माध्यमातून अनोखे आंदाेलन करण्यात आले. सुषमा अंधारेंनी हिंदू देवी-देवता आणि साधू-संताबाबत केलेल्या विधानाबाबतचे व्हिडिआे गेल्या काही दिवसांपासून साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर काळा राम मंदिरापासून रामकुंडापर्यंत दिंडी काढण्यात आली. या वेळी रामकुंड परिसरात सुषमा अंधारेंना गाेदामाई सुबुध्दी द्याी, अशी देखील प्रार्थना करण्यात आली. दिंडीच्या समारोप झाल्यावर पंचवटी पाेलिस ठाण्यात निवेदन देखील देण्यात आले असून अंधारेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या दिंडीदरम्यान काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माेठा पाेलिस बंदाेबस्त देखील तैनात करण्यात आला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.