आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:पाळीव श्वानाला दुचाकीचा धक्का, पाठलाग करत चालकाला मारहाण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाळीव श्वानाला धक्का लागल्याच्या कारणातून तीन तरुणांनी दुचाकीचालकाचा पाठलाग करत त्याला पकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार हिरावाडी परिसरातील पाटाच्या पुढे उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तीन अनोळखी तरुणांच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि विश्वजित शिंदे (रा. आपला महाराष्ट्र काॅलनी, हिरावाडीरोड, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हिरावाडीरोडने दुचाकीने घरी परतत असताना आपला महाराष्ट्र काॅलनीत जाताना मारहाणीचा हा प्रकार घडला.

बातम्या आणखी आहेत...