आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांसमाेर आव्हान:पत्ता विचारण्याचा बहाणा; महिलेने खेचले मंगळसूत्र

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्ता विचारण्याचा बहाणा करत दुचाकीवरील संशयित इसमांकडून सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असताना आता महिलांकडून पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलांचे मंगळसूत्र खेचत असल्याचा प्रकार आडगावच्या कोणार्कनगर २ येथे घडला आहे. या गुन्ह्यात आता महिला चोरही सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

राधिका मनसुरे (रा. कोणार्कनगर २) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काेणार्कनगरातील ज्ञानेश्वरी सोसायटी परिसरातून सायंकाळी ६ वाजता मुलाला खासगी क्लासला सोडण्यासाठी पायी जात असताना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर एक महिला आणि तरुण आला. दुचाकी जवळ उभी करून त्यांनी पत्ता विचारला.

पत्ता सांगत असताना संशयित महिलेने गळ्यातील मंगळसूत्र खेचून दुचाकीने पलायन केले. याच परिसरात राहणाऱ्या मंगला जंजाळकर या सायंकाळी ६.३० वाजता पायी जात असताना संशयित महिलेने पत्ता विचारण्याचा बहाणा करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. जंजाळकर यांनी प्रतिकार केल्याने संशयितांनी पलायन केले. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...