आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:अल्पवयीन मुलीला शहरात नेण्याचा बहाणा करत नातेवाइकाचा बलात्कार

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला शहर दाखविण्याचा बहाणा करत तिला मखमलाबादमध्ये एका फ्लॅटमध्ये नेत तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचे नाव मुलगी सांगत नसल्याने यामागे घरातील व्यक्ती असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. गावातील शाळेत शिक्षण घेते. मुलीला जवळचा नातेवाइक असलेल्या इसमाने नाशिक शहरात खरेदी करण्याचा बहाणा करत तिला मखमलाबाद येथे घेऊन आला. परिसरातील एका नवीन इमारतीतील फ्लॅटमध्ये घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणास काही सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार कुणास न सांगता मुलगी शांत होती.

या संबंधातून मुलीला गर्भधारणा झाली. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. याबाबत विचारणा केली असता मुलीने काहीच सांगितले नाही. मुलीस धमकी दिल्याने तिने संशयिताचे नाव घेतले नाही. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली. गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने गुन्हा म्हसरुळ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

समुपदेशन करणार
मुलीने महिला व बालकल्याण विभागाकडून समुपदेशन केले जाणार आहे. मुलीला विश्वासात घेऊन संशयिताचे नाव समजणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित मुलीचा गर्भपात
पीडित मुलगी लहान आहे. ती २२ आठवड्यांची गरोदर असल्याने जिल्हा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. नुकतेच याबाबत कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...