आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्नेहमिलनात साकारली वर्गाची प्रतिकृती; नांदुर शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा भरवला 23 वर्षांनी वर्ग

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदूर येथील संत जनार्दन स्वामी मनपा शाळा क्र. ८० मध्ये इ. ७ वीत १९९९ च्या बॅचमध्ये शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन झाले. तेथे शालेय वर्गाची प्रतिकृती करण्यात आली होती. बॅनररूूूूूपी फलकावर पट, हजर, गैरहजर व तत्कालीन आठवणींचे फोटो झळकविण्यात आले होते. याद्वारे शाळेतील आठवणीतले प्रसंग साकार करण्यात आले.

तत्कालीन शिक्षक बाळासाहेब सातपुते, सोमनाथ माळोदे, राजेंद्र ढेपले, संजय सोनवणे, सुनंदा जाधव, प्रतिभा देवरे यांचा प्रतीकात्मक वर्गात प्रवेश होताच सर्व विद्यार्थ्यांनी जागेवर उभे राहत टाळ्यांच्या गजरात आपल्या गुरुवर्यांचे स्वागत करत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षस्थानी माजी शिक्षक बाळासाहेब सातपुते हाेते. विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांसमवेत संगीतखुर्ची खेळत आनंद लुटला. शालेय जीवनातील स्नेहसंमेलनातील गीते, कव्वाली, विनोद सादर करत आठवणींना उजाळा दिला.

माध्यमिक शिक्षक सोमनाथ माळोदे, राजेंद्र ढेपले, संजय सोनवणे, सुनंदा जाधव, प्रतिभा देवरे यांनी अतिशय तुटपुंजा पगार असतानाही या विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीने शिकवल्याचे प्रतिपादन करत आज मात्र या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीने कृतार्थ झाल्यासारखे वाटते असे सांगितले.

स्नेहमेळाव्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी नवनाथ निमसे, बुद्धिसागर बागूल, जगन पगार, सविता माळोदे, ज्योती दिंडे यांनी परिश्रम घेतले. मेळाव्यास रवी निमसे, मच्छिंद्र निमसे, रोशन जगताप, भाऊसाहेब चव्हाण, नवनाथ माळोदे, लक्ष्मण पगार, कैलास कुंदे, आरती माळोदे, वनिता निमसे, मंदा ढगे, सुनीता पवार आदी वर्गमित्र उपस्थित होते.मेळाव्याचे सूत्रसंचालन कीर्ती खैरनार, स्वागत भाऊसाहेब चव्हाण तर आभार जगन पगार यांनी मानले.शेवटी सर्व वर्गमित्र व उपस्थित शिक्षकांनी एकत्र स्नेहभोजन घेतले.

बातम्या आणखी आहेत...