आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा‎:कळवण यात्रोत्सवात पहिल्या‎ दिवशी 300 कुस्त्यांची दंगल‎

कळवण‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे सुरु असलेल्या श्री विठोबा महाराज यात्रा‎ महोत्सवाच्या निमित्ताने कै. राजाराम पगार‎ कुस्ती मैदानावर झालेल्या पहिल्या दिवसाच्या‎ कुस्ती दंगलीत छोट्या मोठ्या ३०० कुस्ती‎ झाल्या. यावेळी लाखो रुपयांच्या बक्षीसाची‎ लयलूट करण्यात आली.‎ श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव, श्री‎ विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, कळवण‎ नगरपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने‎ आयोजित कुस्ती दंगलीचे उदघाटन आमदार‎ नितीन पवार यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी‎ म्हणून नगराध्यक्ष कौतिक पगार, धनंजय पवार,‎ राजेंद्र भामरे, राजेंद्र आहेर, मोतीराम पगार‎ आदी उपस्थित होते.

आज पहिल्या दिवशी ३००‎ कुस्त्या झाल्या. यामध्ये १०१ रुपयापासून ११‎ हजार रुपयापर्यंतची कुस्ती झाली. राज्यातील‎ येवला,मनमाड, भगूर, नाशिक, पुणे,‎ कोपरगाव, सातारा, सांगली, मुंबई, धुळे,‎ जळगाव आदी ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी‎ लावून लक्षवेधी कुस्त्या केल्या. मैदानावर‎ तब्बल दोन लाख रुपयांची बक्षिसे वाटण्यात‎ आली. पंच म्हणून ॲड. परशुराम पगार,‎ सुधाकर पगार, रवींद्र पगार, भावराव पगार,‎ जितेंद्र पगार, राजेंद्र पगार, मोतीराम पगार,‎ नितीन पगार, शामराव पगार, बबलू पगार,‎ सचिन पगार, अमोल पगार, अजय पगार बापु‎ पगार, नंदू पगार, साहेबराव पगार, माणिक पगार‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...