आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:बहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या सुरक्षारक्षकाचा भावाकडून खून ; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने याच साइटवर काम करणाऱ्या बिगाऱ्याच्या बहिणीवर वाईट नजर ठेवल्याने दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत सुरक्षा रक्षकाच्या डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढणे काॅलनी येथे रो-हाऊसच्या बांधकामावर सतलाल मुकरी प्रसाद वय ४० रा. उत्तर प्रदेश हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. याच साइटवर संशयित योगेश पंढरीनाथ डंबाळे वय २७ रा. ननाशी हा बिगारी म्हणून काम करतो. त्याच्यासोबत त्याची बहीण बिगारी म्हणून काम करते.

सुरक्षारक्षक सतलाल प्रसाद हा नेहमी डंबाळे याच्या बहिणीकडे वाईट नजरेने बघत होता. गुरुवारी रात्री डंबाळे हा मद्य पिऊन आला. सतलाल यास माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने का बघतो, असा जाब विचारल्याने झटापट झाली. डंबाळे याने सतलालच्या तोंडावर मारल्याने तो दगडावर पडून त्याच्या डोक्यास मार लागला तो तसाच त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपला. सकाळी तो बेशुद्ध असल्याचे समजले. त्याला सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. संशयित योगेश डंबाळे यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...