आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संविधानामुळे कर्तव्यांची जाणीव; मराठा हायस्कूलमध्ये मान्यवरांचा संवाद

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संविधानामुळे देश एकसंघ आहे. हक्क व प्रतिष्ठेसाठी संविधानाचा अभ्यास प्रत्येकाने करावा. संविधानामुळे कर्तव्यांची जाणीव हाेते, असे मार्गदर्शन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमध्ये संविधान जागृती सप्ताह निमित्ताने आयाेजित कार्यक्रमात मान्यवरांनी केले.संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, एस. डी. जगमलानी, एस डी इंदलकर, सोनल गायकर, संजय सोनार, कमलेश पाळेकर, प्रतीक शिंदे, मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे, उपमुख्याध्यापक संजय डेर्ले, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे व रंजना घंगाळे उपस्थित होते.

प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांनी केले. एस टी जगमलानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय, संविधानाची मूल्य म्हणजे काय, मूल्यांची रुजवणूक करणे म्हणजे नेमके काय याबाबत मार्गदर्शन केले.

भारतीय संविधान हे आपल्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहे या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हक्क व प्रतिष्ठेसाठी आग्रह करताना आपल्या कर्तव्यांचाही आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे,असे त्यांनी सांगितले.सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले. तर आभार विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय डेर्ले यांनी मानले. सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख गिते सी एस व समितीतील सर्व सदस्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...