आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनची कुरापत:मालेगाव येथील जवानास गलवान खोऱ्यात वीरमरण, अचानक सोडले होते नदीचे पाणी

मालेगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माेरे गेल्या 17 वर्षांपासून भारतीय लष्करात एसपी-115 मध्ये कार्यरत हाेते

भारत-चीन सीमेवरील गलवान खाेऱ्यात पुलाचे बांधकाम सुरू असताना चीनने रात्री अचानक नदीत पाणी सोडल्याने वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना निमगुले साकूर (ता. मालेगाव) गावच्या जवानास वीरगती प्राप्त झाली. सचिन विक्रम माेरे असे या जवानाचे नाव असून त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शनिवारी (दि. २७) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

माेरे गेल्या १७ वर्षांपासून भारतीय लष्करात एसपी-११५ मध्ये कार्यरत हाेते. त्यांचे पार्थिव पुणे येथे आणले जाणार आहे. तेथून नाशिक व मूळ गावी निमगुले येथे नेले जाईल. माेरे यांच्या पश्चात आई, वडील, दाेन भाऊ, पत्नी, दाेन मुली व सहा महिन्यांचा मुलगा आहे. गलवान खाेऱ्यात चीन रस्त्याचे बांधकाम करत आहे. भारतानेही नदीवर पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. बुधवारी रात्री चीनने नदीत पाणी साेडले. या प्रवाहात भारताचे तीन जवान वाहून जात हाेते. माेरे यांनी थेट नदीत उडी घेतली. मात्र, दगडावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...