आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MNGLकडून शहरात 4 हजार घरांपर्यंत गॅसची जाेडणी:वर्षात 1.25 ग्राहकांपर्यंत पोहचणार; ग्रामीण भागतही होणार वितरण

नाशिकएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरातील मनपाच्या सहाही विभागात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड (एमएनजीएल)कंपनीकडून गेल्या दाेन वर्षांपासून पर्यावरणपूरक व स्वच्छ ज्वलनशील अशा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) या स्वरूपात नैसर्गिक वायू पुरवठा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पहिल्या टप्यात सुमारे ४ हजार घरांपर्यंत घरगुती गॅस पुरवठा सुरू झाला असून लवकरच वितरण व्यवस्थेचा विस्तार करण्यात येत असल्याने वर्षभरात १ लाख ते १.२५ लाख घरांपर्यंत पुरवठा करण्याचे उद्धिष्टय आहे. घरगुती ग्राहकांसह २० सीएनजी स्टेशनसह सुमारे ७ हजार वाहनांनाही नियमीत पुरवठा केला जात आहे.

शहर व तालुका आणि ग्रामीण भागात सीएनजी ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी एमएनजीएल कडून सी एन जी स्टेशन स्थापित करीत आहे. सोबतच स्टील पाईपलाईनचा विस्ताराचे काम सात्यत्याने सुरू असल्याचे कंपनीच्या अधिकृत सुत्रांनी सांगिलते. सीएनजी व पीएनजी पुरवठा करणाऱ्या एमएनजीएल या कंपनीच्या नियाेजनानुसारत शहर व परिसरात 20 सीएनजी स्टेशन द्वारे सुमारे 7,000 वाहनांना नियमीत सीएनजी पुरवठा करीत आहे. ऑनलाइन सीएनजी स्टेशन्सचा समावेश आहे, त्यातून ग्राहकांना विना विलंब व तासनतास ताटकळन न बसता वेळेतच अखंडित पुरवठा केला जात आहे.

एमएनजीएल ने १५ उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांसह घरगुती ग्राहकांना पीएनजी पुरवठा सुरू केला आहे. कंपनीने सुमारे 300हून अधिक किलोमीटरचे स्टील आणि मध्यम दाबाचे पाइपलाइन नेटवर्क तयार केले आहे. एमएनजीएलने 2019 पासून गॅस वितरणाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक वायू पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नाशिक नजीक नसल्यामुळे सद्यस्थितीत सीएनजी पुण्यातून कॅस्केडद्वारे गाड्यांमधून आणून ताे वितरीत केला जात आहे.

गेल लिमिटेड मुंबई-नागपूर-झारसुगुडा यामार्गावर नैसर्गिक वायू पाईपलाइन प्रकल्प विकसित केला जात आहे. हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातून जाणार असून सन 2023-24 मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. नाशिक-धुळे भौगोलिक क्षेत्रामध्ये पाइपलाइन कनेक्टिव्हिटी नसल्याने एमएनजीएलने' एलएनजी' स्टेशन उभारण्याच्या व्यवहार्यतेची तपासणी करून, एलएनजी स्टेशन स्थापित केले आहे. एलएनजी सुविधा हामार्गावर पाथर्डी येथे सुरू केला असून , स्टेशन भारतातील प्रमुख अत्याधुनिक सुविधांपैकी एक आहे. प्रतिदिन सुमारे1 लाख क्युबिक मीटर नैसर्गिक वायूचे वितरण या एलएनजीसुविधेद्वारे करीत आहे. त्याद्वारे शहरातील सीएनजी व घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक वापराकरिता मागणीचा पुरवठा केला जात आहे.

महापालिका परिवहनच्या सुमारे 200 बसेस सीएनजीवर धावत आहेत. सध्या अंबड एमआयडीसी, पाथर्डीफाटा, सातपूर, इंदिरानगर, बिटकोरोड, नाशिकरोड, जेलरोड, सोमेश्वररोड, अंबड-सातपूररोड, सोमेश्वररोड, सिन्नर,इगतपुरी आदी भागात सीएनजी पुरवठा करत आहे.

बातम्या आणखी आहेत...