आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:शहरात आजपासून तीन‎ दिवसांचे योग साधना शिबिर‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील पहिले‎ आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ म्हणून‎ प्रसिद्ध असलेल्या बिहार स्कूल‎ ऑफ योग, मुंगेर, बिहार, श्री‎ पंचवटी एज्युकेशन सोसायटी‎ आणि सत्यानंद योगदर्शन पीठ,‎ त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने‎ ३ ते ५ फेब्रुवारीपर्यंत याेग साधना‎ शिबिराचे आयाेजन करण्यात आले‎ आहे. निमानी बस स्टॅन्ड जवळ,‎ पंचवटी कारंजा, नाशिक येथे आर.‎ पी. विद्यालयाच्या भव्य पटांगणात‎ दरराेज सकाळी ६.३० ते ८.०० व‎ सायंकाळी ६.३० ते ८.०० हे शिबिर‎ हाेणार आहे.‎ शिबिरात स्वामी शिवराजानंद‎ सरस्वती मार्गदर्शन करणार आहेत.‎

सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी‎ सैल कपडे परिधान करून येताना‎ सतरंजी- योग मॅट बरोबर आणावे.‎ प्रवेश नि:शुल्क असणाऱ्या या‎ शिबिरात नागरिकांनी जास्तीत‎ जास्त संख्येने सहभागी व्हावे,‎ असे आवाहन स्वामी शिवराजानंद‎ सरस्वती व योग गुरू नंदकुमार‎ देसाई यांनी केले आहे. भारतातील‎ याेग विषयातील काही तज्ज्ञ यात‎ मार्गदर्शन करतील. कार्यक्रमासाठी‎ समिती गठित करण्यात आली‎ असून बैठकीत कार्यक्रमाचे‎ नियाेजन करण्यात आले. त्यात‎ अनेक महिला स्वयंसेवक देखील‎ सहभागी झाले आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...