आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली येथील प्रसिद्ध उदयन केअर या संस्थेच्या नाशिक शाखेच्या वतीने 50 मुलींना बी. सी. जिंदाल फाऊंडेशन यांच्या सहयोगाने उदयन शालिनी फेलोशिपअंतर्गत पाच वर्षांकरिता आर्थिक मदतीच्या रूपाने शिष्यवृत्ती देण्यात आली.
या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांचा साधारण पाच वर्षांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च जो साधारण प्रतिवर्ष 12 हजारांपर्यंत येतो, तो संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही संस्थेतर्फे 50 विद्यार्थिनींना स्कॉलरशिप देण्यात आलेली होती.
विद्यार्थिनींना मिळणार बळ
या उपक्रमातून 50 विद्यार्थीनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळत असून साधारणत: एकीला वर्षाला 12 हजार म्हणजे एका वर्षात 6 लाख रूपये संस्था खर्च करणार आहे. पाच वर्षातील हीच मदत 30 लाखांची हाेतेे. या शिष्यवृत्तीमुळे या विद्यार्थीनींना त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिक्षण घेणे सुलभ हाेऊ शकणार आहे.
अनोखा उपक्रम
दिल्लीमध्ये 2002 मध्ये स्थापन झालेल्या उदयन केअर या संस्थेच्या भारतात 32 शहरांमध्ये शाखा आहेत. उदयन शालिनी फेलोशिप हा उदयन केअरचा अनोखा उपक्रम असून, त्यात दुर्बल सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीतील पात्र व हुशार मुलींसाठी शैक्षणिक उत्कृष्टता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यक्रम राबविते. या कार्यक्रमाचा उद्देश मुलींना त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह सक्षम करणे, जेणेकरून त्यांना त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी बळ देण्यासह उत्तम जीवन जगता यावे, हा आहे.
महात्मानगर येथील क्रिस्टल बँक्वेट येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी यूएसएफचे सहयोगी संचालक मोहम्मद फहीम खान, विश्वास बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, निवेकचे अध्यक्ष संदीप गोयल, आशा गोलिया, रुचिता ठाकूर, नितीन पाटील, राजेश बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना साबू, प्रिया हरिहरन, रेणू वावरे, दीपाली गुप्ता, ममता पंजवानी, शैलजा कलकुरी, विनिता बंका, कोमल आहुजा, जॉयस पाडळे आदींनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.