आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा:विनाखर्च उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करता येते!

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाही, मी पालक ऑफिसला गेल्यावर मुलांची काळजी घेणाऱ्या किंवा गेल्या वर्षी राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेणाऱ्या शाळांबद्दल बोलत नाही. मी मुलांमधील व्हिटॅमिन-डीची कमतरता भरून काढणाऱ्या शाळांबद्दल बोलतोय! ते हे का आणि कसे करत आहेत याबद्दल आश्चर्य वाटते? मुंबईतील काही शाळांकडे याचे उत्तर आहे, त्यांनी या आठवड्यातच याची सुरुवात केली झाले. महामारीदरम्यान ऑनलाइन क्लासेसमुळे मुलांना उन्हात खेळता आले नाही, हे उघड गुपित आहे. आज कोणत्याही डॉक्टरांना विचारले तर ते त्यांच्याकडे व्हिटॅमिन-डीची कमतरता असलेली काही रुग्ण मुले येत असल्याचे सांगतील. बालरोगतज्ज्ञ सांगू शकतात की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे नंतर रिकेट्ससह अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळेच मुंबईतील शाळांनी याला तोंड देण्यासाठी एक अभिनव मार्ग शोधला आहे. सकाळची सभा बाहेर मोकळ्या प्रांगणात घेण्याची परंपरा देशातील जवळपास सर्वच शाळांमध्ये आहे, पण जो तास दिवसअखेर असायचा, तो आता सकाळी सर्वात आधी करण्याचा नवीन ट्रेंड आहे. सकाळी ७.३० ते ९ या वेळेत वर्ग घेण्यासाठी शाळांच्या प्रत्येक मोकळ्या कोपऱ्याचा, मैदानाचा, बागेचा पुरेपूर वापर केला जात आहे.मॉर्निंग वॉकव्यतिरिक्त या शाळांत निसर्ग निरीक्षणवर्ग, काही शारीरिक शिक्षण वर्ग, काही क्रीडा वर्ग, तर काही कमी सावलीच्या झाडाखाली त्यांचे नियमित वर्ग घेत आहेत. ते केवळ मोकळ्या जागेत कला आणि हस्तकला वर्गच घेत नाहीत, तर गुरुकुल शैलीत गणित आणि विज्ञानाचे वर्गही घेत आहेत. एकंदरीत या शाळांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना ताज्या हवेत श्वास घेता यावा आणि शक्य तितका कोवळा सूर्यप्रकाश मिळावा, हे आहे. सकाळी ७.३० ते ७.५० या वेळेत मुलांना प्रार्थनेत सूर्यप्रकाश मिळतो. मग आठवड्यातून किमान तीन वेळा मोकळ्या जागेत एकामागून एक वेगवेगळे वर्ग भरवले जातात, जेणेकरून व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान काही प्रमाणात भरून काढता येईल.सरकारी शाळांमध्ये असे होत नाही, कारण येथे येणारी मुले उन्हात चांगला वेळ घालवतात. ठाण्यातील सिंघानिया स्कूल, कुलाब्यातील आर्मी पब्लिक स्कूल आणि विक्रोळीतील श्री गुरुगोविंदसिंग इंग्लिश हायस्कूल आदी महागड्या शाळांमध्ये हे घडत आहे. कल्पना चांगली वाटते, परंतु बालरोगतज्ज्ञांच्या मते, या शाळांच्या चेकलिस्टमध्ये काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेवर मात करणे हाच जर उन्हात वेळ घालवण्याचा एकमेव उद्देश असेल, तर मुलांनी पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि ट्राउझर्सऐवजी शॉर्ट््स आणि टी-शर्ट घालणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामुळे त्यांच्या बहुतांश त्वचेला थेट सूर्यप्रकाश मिळेल. हिवाळा हळूहळू देशभरात प्रभाव दाखवू लागला आहे, शाळांनी हा सल्ला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना निसर्गाचा उत्तम फायदा घेता येईल. मुंबईत हिवाळा कमी आणि मर्यादित दिवसांचा असला तरी शाळांनी आता त्या मर्यादित दिवसांचा पुरेपूर वापर करण्याचे ठरवले आहे, जेणेकरून त्यांच्या मुलांना नैसर्गिकरीत्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करता येईल. परंतु, अर्ध्या भारतामध्ये कडाक्याची थंडी आहे, अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा घेऊन मुलांमध्ये व्हिटॅमिन-डीची पूर्ती केली पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...