आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अवघाची महाराष्ट्र जलसाक्षर करील':निसर्गरक्षक निर्माणाचा अनोखा उपक्रम; जलसंकटावर मात करण्यासाठी सहज जलबोध अभियान सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक हवामान बदलांमुळे जनमानसाला तोंड द्याव्या लागणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी गावोगावी प्रशिक्षित निसर्गरक्षक निर्माणाचा उपक्रम सहज जलबोध अभियानाने हाती घेतला आहे. या उपक्रमाची तसेच अभियानंतर्गत दि. 20 जूलै 2022 रोजी 'भूजल केंद्रीत पाणलोट आराखडा निर्माण' या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची माहिती अभियानाचे राज्य समन्वयक मयूर बागूल यांनी यावेळी दिली.

सहज जलबोध अंतर्गत सूचवलेल्या कृती कार्यक्रमांची माहिती देणे, जल आराखडा, निसर्ग बेट, भूजल पुनर्भरण, तलाव निर्माण या कृती कार्यक्रमाशी निगडीत फिल्ड व्हिजिट, तांत्रिक मार्गदर्शन आणि सविस्तर डॉक्युमेंटेशन ठेवणे ही महत्वाची कामे केली जातात. पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आणि केंद्रीय भूजल विभागात कार्यरत ज्येष्ठ भूजलवैज्ञानिक आणि सहज जलबोधकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास परिचित उपेंद्र धोंडे यांच्या जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत समाजात जनजागृतीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा पुढील टप्पा आहे.

असे सुरू आहे काम

'अवघाची महाराष्ट्र जलसाक्षर करील' हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेल्या उपक्रमात आतापर्यंत जलसाक्षरता प्रसारासाठी आठ पुस्तके, 51 पुस्तिका, शेकडो लेख, 22 निसर्ग बेट, 100 जल आराखडे, शेकडो भूजल पूनर्भरण प्रकल्प आणि 12 तलाव पुनरुज्जीवन अशा अनेक प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांपर्यंत पोचलेली आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट

सहज जलबोध अभियानाशी जोडले जाण्यासाठी 10 दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अवघड अट असून देखील अभियानात जोडले जाणारांची संख्या वाढतच आहे. सध्या या कार्यकारिणीत केंद्रीय समन्वयक, राज्य समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक व शेवटी निसर्ग रक्षक अशी रचना आहे. उपेंद्र धोंडे हे आपल्या भूजलवैज्ञानिक म्हणून प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग या अभियानात मुख्य मार्गदर्शक म्हणून करत आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रतून कित्येक तरूण भूवैज्ञानिक, कृषी अधिकारी आणि सामाजिक तज्ञ असे तांत्रिक मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे.

अशी आहे टीम

सहज जलबोध अभियान कोअर टिममध्ये मयूर बागूल, ऍड. प्रभाकर तावरे-पाटील, प्रशांत शिनगारे, शशांक अहिरे, प्रकाश चोले, शैलेंद्र पटेल, राहूल घोलप, प्रशांत राऊळ, समाधान लभडे, प्रितिश बरे, आराधना ताठे, भिला पाटील, कविता सरवदे, विश्वास सुर्यवंशी, गुरू भांगे, ओंकार कडेकर, एड. आनंद बागवडे

बातम्या आणखी आहेत...