आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस पाइपलाइन:एबीबी ते जेहान सर्कलपर्यंत डांबरीकरण पॅचचा देखावा

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यंबकराेडवरील एबीबी सर्कल ते जेहान सर्कलवरील खड्डे बुजविण्याचे काम तर हाती घेण्यात आले मात्र डांबरीकरणाच्या पॅचचा देखावाच अधिक दिसून येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एबीबी सर्कल ते जेहान सर्कलपर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला गॅस पाइपलाइनसाठी रस्ते खाेदण्यात आले हाेते. त्यातच यंदा जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाढच झाली. उच्चभ्रू वसाहत आणि अनेक अधिकारी याच रस्त्यावर वास्तव्यास असतानाही या रस्त्याच्या कामाकडे महापालिकेचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करत हाेते. अखेरीस नागरिकांच्या तक्रारीनंतर पालिकेने रस्ता दुरुस्तीचे काम हाती तर घेतले. मात्र फक्त माेठे खड्डे ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी डांबराचे पॅच मारले. जवळपास छाेटा खड्डा असेल तर ताे तसाच ठेवला. रस्त्यावर अनेक ठिकाणी असेच देखाव्याचे काम झाल्याने परिसरातील नागरिकांसह या रस्त्यावरून नियमित जाणारे वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...