आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन‎:कलापुष्प मध्ये देशभक्तीचा जागर

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांच्या कालखंडानंतर‎ मानवधन सामाजिक शैक्षणिक‎ विकास संस्था संचलित‎ धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व‎ प्राथमिक शाळेचा कलाषुष्प‎ सोहळा उत्साहात पार पडला.‎ विद्यार्थ्यांनी देशभक्ती, स्वच्छ‎ भारत, कृषी प्रधानता, विविध‎ राज्यातील लोक परंपरा,‎ पारंपारिक सण, बेटी बचाव,‎ पाणी बचत, ऊर्जा बचत‎ अभियान अशा विविध‎ विषयावर नृत्य, संगीताच्या‎ माध्यमातून प्रकाशझोत‎ टाकला.‎

या कार्यक्रमाला प्रमुख‎ पाहुणे म्हणून अामदार हिरामण‎ खोसकर, जिल्हा नियोजन‎ समितीचे सदस्य गोरख‎ बोडके, शशिकांत जाधव, डाॅ.‎ अतुल वडगावकर, डाॅ. पूजा‎ वडगावकर, संस्थेचे‎ संस्थापक प्रकाश कोल्हे,‎ संस्था सचिव तथा‎ मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे‎ आदी मान्यवर उपस्थित होते.‎

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची‎ सुरुवात झाली. प्रास्ताविक‎ शाळेच्या उपमुख्याध्यापिका‎ पूनम पाटील यांनी केले. ज्योती‎ कोल्हे यांनी शाळेच्या प्रगतीचा‎ आलेख सादर केला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ अपर्णा कुलकर्णी व पंकज‎ कुवर यांनी केले. आभार‎ प्रदर्शन विठ्ठल जाधव यांनी‎ मानले. कार्यक्रमाच्या‎ यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व‎ मानव सेवकांनी अथक परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...