आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिंदाल पाॅलिफिल्म कंपनीत आगीने राैद्ररूप धारण केल्यानंतर परिसर धुराच्या लाेटांनी पूर्ण भरून गेला हाेता. सुरक्षिततेच्या उपाययाेजना अन् बचावकार्यात अडथळा येऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणेशिवाय आत काेणालाही प्रवेश नव्हता. मात्र घटनास्थळी ‘दिव्य मराठी’च्या टीमने कसातरी आत प्रवेश मिळवला.
एकीकडे अग्नितांडव सुरू असताना दुसरीकडे बचावकार्यासाठी कंपनीच्या सेफ्टी पाॅइंट परिसरात २० ते २५ रुग्णवाहिका तैनात हाेत्या. भयावह वातावरणात कंपनीच्या आवारात केवळ एेकू येत हाेते ते अग्निशमन दल व रुग्णवाहिकांच्या सायरनचे अंगावर काटा आणणारे आवाज. अशातच आगीपासून वाचण्यासाठी उंच ठिकाणी गेलेला व धुरात गुरफटलेला कर्मचारी मदतीसाठी आेरडत हाेता. ते पाहून खुद्द जिल्हाधिकारी गंगाधरन डी पुढे सरसावले अन् त्यांनी सर्वांना पटापट सूचना केल्या. अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत त्या कर्मचाऱ्याची सुटका केली. मात्र त्याचा चेहरा पूर्णपणे काळाठिक्कर पडला हाेता. पुढील उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे रवाना केले. हे सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीतील डिझेल टँक पेटल्याचे सांगण्यात आले व बचाव पथक तातडीने तिकडे धावले.
मूठभर कुरमुरे, घाेटभर पाणी
आगीच्या घटनेेनंतर बाहेर आलेल्या इतर कर्मचारी व कुटुंबीयंानी कुरमुरे, फरसाण, पाणी देत त्यांना मदतीचा हात दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.