आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:भाजीबाजारात महिलेची दीड लाखाची सोनसाखळी खेचली

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजी बाजारात पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या चाेरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे मंगळसूत्र खेचले. धात्रक फाटा येथे भाजीबाजारात हा प्रकार घडला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया वाघ (रा. धात्रक फाटा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, धात्रकफाटा येथे भाजीपाला बाजारात जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या इसमाने वाघ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले. चाेरटा ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने पलायन केले. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...