आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नायलॉन मांजाने कापला तरुणाचा गळा ; सातपूर परिसरातील महादेवनगरातील घटना

सातपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धोकादायक नायलॉन मांजाने सातपूरच्या महादेवनगर येथील तरुणाचा गळा चिरल्याची घटना घडली. प्रवीण महादू वाघ हे कामानिमित्त दुचाकीने सातपूरच्या खोका मार्केटला परिसरात गेले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास त्यांच्या गळ्याभोवती नायलॉन मांजाने विळखा घातल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखम खोलवर असल्याने आठ टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

दीड महिन्यावर संक्रांत असून सातपूर परिसरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री सुरू आहे. गळा कापल्यावर घटनास्थळी पतंग उडविणाऱ्या मुलाने मांजाची फिरकी तशीच टाकून पलायन केले आहे. प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रेते दुकानदार, खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करावी व मांजा न वापरण्याबाबत जागृती करावी, अशी मागणी जखमी प्रवीण वाघ यांनी केली आहे.

जनजागृती मोहीम हवी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर पतंगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येताे. सर्वत्र पतंग उडवणारे दिसून येत आहेत. नायलाॅन मांजामुळे अनेकांचे हात, पाय निकामी झाले आहे. नायलॉन मांजा बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याची अंमलबजावणी व्हावी.

बातम्या आणखी आहेत...