आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांगेत ३०० विद्यार्थी आधार अपडेट ५०:सर्व्हर डाऊनमुळे आधार अपडेशनला विलंब; प्रवेश रखडले पालक, विद्यार्थ्यांत राेष

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयांकडून प्रवेशावेळी विद्यार्थ्यांच्या अपडेट आधारकार्डची मागणी होत असल्याने ते अपडेट करण्यासाठी एका केंद्रावर रोज किमान ३०० विद्यार्थ्यांची रांग आहे. मात्र नेहमीच सर्व्हर डाऊन हाेत असल्याने केवळ ५० ते ६० विद्यार्थांचेच आधारकार्ड अपडेट हाेतात. यामुळे अनेक विद्यार्थांचे प्रवेश रखडल्याने यंत्रणेविराेधात राेष निर्माण हाेत आहे.

आधार केंद्रावर एका आधारकार्डच्या अपडेटसाठी किमान १५ मिनिटे लागतात. दिवसभरात वेळ ३० ते ४० जणांचेच आधार अपडेट होते. केंद्रचालकांनी ५० पेक्षा जास्त जणांची नोंदणी होणार नसल्याचे सांगितल्याने पालक दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगा लावतात. द्वारकावरील जम्बो आधारकार्ड केंद्रात मात्र एका दिवसात १०० कार्ड अपडेट हाेतात.

१० दिवस उलटूनही अपडेट नाही
मागील आठवडाभरापूर्वी दोन दिवस सलग आधार केंद्रावर चकरा मारून आधारकार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया केली. मात्र,आता दहा दिवस उलटले तरी आधारकार्ड अपडेट झालेले नाही.
अविनाश बेदरकर, विद्यार्थी

पूर्ण कागदपत्र देण्याची गरज
ज्या विद्यार्थांचे आधारकार्ड अपडेट झालेले नाही ते लवकर होईल. मात्र विद्यार्थ्यांनी आधारकार्ड अपडेटला देताना सर्व कागदपत्रे तपासून व्यवस्थित दिल्यास आमचा व विद्यार्थ्यांचा तो वेळही वाचेल.
ऋषिकेश पाटील, द्वारका आधार केंद्र

बातम्या आणखी आहेत...