आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार केंद्रांमध्ये सर्व्हर डाऊन:10 ते 12 हजार नागरिकांचे आधार दोन दिवसांत अपडेट

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधार केंद्रांमध्ये सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे कार्ड अपडेट हाेत नसल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी (दि. ४) प्रसिद्ध करताच विविध आधार केंद्रांवर यंत्रणेत सुधारणा करण्यात येऊन दोन दिवसांत १० ते १२ हजार नागरिकांचे आधारकार्ड अपडेट झाल्याची माहिती जिल्हा व्यवस्थानपाने दिली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे आधार अपडेट प्राधान्याने करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालय सक्रिय झाले असून विद्यार्थ्यांची आधार अपडेटसाठी आधार केंद्रांवर गर्दी होत आहे. मात्र, शहरातील काही आधार केंद्रांवर एका आधारकार्डच्या अपडेटसाठी १० ते १२ मिनिटांचा कालावधी लागत असल्याने दिवसभरात केवळ ३० ते ४० जणांचेच आधार अपडेट होते.

प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त संख्येने विद्यार्थी पालक रांगेत उभे असतात. केंद्रचालकांनी ५० पेक्षा जास्त जणांची नोंदणी होणार नसल्याचे सांगितल्याने पालक दुसऱ्या दिवशी क्रमांक लागण्याची आशा घेऊन परतत आहेत. यासंदर्भातील वृत्त ‘दिव्य मराठी’ने ‘रांगेत ३०० विद्यार्थी, आधार अपडेट ५०’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करताच व्यवस्थापनाने यंत्रणेत सुधारणा केली आहे. द्वारकावरील जानकी प्लाझातील आधार केंद्रावर एका दिवसात १०० वर आधार अपडेट केले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...