आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ चूल मांडून भाकरी थापून आपचे अनोखे आंदोलन:शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅस दरवाढ आणि आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून त्यावर भाकरी थापून आणि कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा फोडून अनोखे आंदोलन केले. जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले.

आर्थिक नुकसान

भारत सरकारने वेळोवेळी सिलेंडरचे भाव हे 50 ते 100 रुपयाने दर चार ते पाच महिन्यांनी वाढवले आहेत. सतत होणारी ही दरवाढ ही गरीब वंचित शोषित लोकांच्या आर्थिक नुकसान करत असल्याचे दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

अन्न व्यवस्था विस्कळीत होईल

ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय चालला आहे तो तात्काळ थांबविला गेला पाहिजे, शेतकरी हा अन्नदाता असून त्याने जर अन्न पिकवणे बंद केले तर देशात हाहाकार माजेल. त्यांचीच सरकारने जर काळजी घेतली नाही तर तो पूर्ण कोलमडेल आणि देशातील अन्न व्यवस्था विस्कळीत होईल.

या दोन अती महत्त्वाच्या मागण्यांसाठी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या गेटवर हे अनोखे आंदोलन केले, ह्यावेळी पूर्व विधानसभेचे अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभेचे अध्यक्ष गिरीश उगले पाटील, शहर युवा अध्यक्ष अमर गांगुर्डे, शहर युवा सचिव प्रदीप लोखंडे, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अभिजीत गोसावी, पूर्व महिला अध्यक्ष शेतांबरी आहेर, प्रसिद्धी प्रमुख चंदन पवार, युवा उपाध्यक्ष संदीप गोडसे आणि पदाधिकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...