आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पार्टीने केले भिख मांगो आंदोलन:जमा झालेले पैसे शहर अभियंताच्या नावे मनीऑर्डर, यातून रस्त्यांची दुरुस्ती करा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे दुरुस्तीसाठी महापालिकेसमोर आंदोलन करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने ठिकठिकाणी भीक मांगो आंदोलन करून नागरिकांकडून पैसे घेण्यात आले. यातून जमा झालेले 211 रुपये मनपाचे शिवकुमार वंजारी यांच्या नावाने खड्डे दुरुस्तीसाठी वापरावे यासाठी मनीऑर्डर करण्यात आली.

आम आदमी पार्टी नाशिककडून महानगरपालिका रस्ते दुरस्तीसाठी अनोखे भिक मांगो आंदोलन वडाळा रोड याठिकाणी करण्यात आले. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांकडून स्वखुशीने एक रुपया मागण्यात आला. जे पैसे जमा झाले त्या पैशाचा गल्ला आयुक्तांना देण्याचा मानस होता.

अधिकारी भेटले नाही

आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त व्हावेत यासाठी रस्ते व बांधकाम शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना देण्यात येणार होते. त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला परंतु त्यानंतर ते वेळ देऊनही भेटले नाही. सतत दोन दिवस त्यांनी काही कारणास्तव वेळ दिली नाही. शेवटी जमा झालेले 211 रुपये भारतीय पोस्ट मनीऑर्डरने त्यांना पाठवुन देण्यात आले.

रस्ते दुरुस्तीची मागणी

कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेकड़े रस्ते दुरुस्तीची मागणी केली. त्या-त्या वेळी निधी नसल्याचे अधिकारी यांच्याकड़ून वारंवार सांगण्यात आले. शेवटी व्यवस्थेच्या रटाळ उत्त्तरांना कंटाळून आम्ही नागरिकांकडून निधी जमा केला आणि तो निधी महानगरपालिकेच्या रस्ते दुरुस्ती विभागाच्या अधिकारी यांना पाठवून दिला.

मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करु

यावेळी आम आदमी पार्टीचे नाशिक-देवळाली विधानसभा अध्यक्ष गिरीष उगले पाटील, योगेश कापसे, माझीद पठान, स्वप्निल घिया, प्रकाश कनोजे, प्रदीप लोखंडे, अनिल फोकने आणि चंदन पवार उपस्थित होते. आता तरी महापालिका प्रशासनाने शहरातील खड्ड्यांची दुरावस्था बघून तातडीने त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावी अन्यथा दररोज शहर व परिसरात या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडतील. व त्यात निष्पाप नागरिकांचा बळी जाऊ नये याची देखील दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. अन्यथा आम आदमी पार्टी शहरातील प्रत्येक मोठ्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...