आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये आम आदमी पार्टीचे अनोखे आंदोलन:खड्डे, कचऱ्यासाठी जबाबदार निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या घरांसमोर बडवले ढोल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थकबाकी वसुल करण्यासाठी ज्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी थकबाकीदारांच्या घरासमाेर ढाेल बजाव माेहिम राबवत आहे. त्याच प्रकारे रस्त्यावरील खड्डे, कचऱ्यासाठी जबाबदार असणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या घरांसमाेर ढाेल बडवण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे.

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील अनेक राजकीय पक्षांनी सामाजिक प्रश्नांना हात घालत आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही आघाडीवर आहेत. निवडणूकीच्या निमित्ताने आप कडून लाेकांमध्ये मिसळून जनजागृती केली जात असतानाच विविध प्रश्नांसाठी आंदाेलने केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी (दि. १) अशाेकामार्गावरील वडाळाराेड येथे खड्ड्यांच्या प्रश्नांसदर्भात ढाेल बजाआे आंदाेलन करण्यात आले.

महानगरपालिकेतर्फे विविध करांची एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या लाेकांच्या घरांसमाेर ढाेल बजाआे माेहिम राबवली जात आहे. हा एक प्रकारे लोकांचा अनादर आणि अपमान करण्याचा प्रकार असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. ज्या लोकांनी घरपट्टी भरली नाही त्यांच्या घरासमोर जाऊन हे अधिकारी जर ढोल बडवीत आहेत. महापालिका हे करण्याचा अधिकार ठेवू शकते तर कर भरणाऱ्या जनतेलाही तसा अधिकार आहे. त्यामुळे जेथे कचरा आहे, खड्डे आहेत आणि जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत नाहीत त्या अधिकाऱ्यांच्या घरांसमोर आम आदमी पार्टी ढोल बडवणार आहे.

अशाेका मार्ग वडाळा राेडवरील खड्ड्यांपासून याची सुरवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपुर्ण नाशिक मधील खड्डे गुळगुळीत करावेत अन्यथा आठ दिवसांनंतर अधिकाऱ्यांचा घरासमोर "ढोल बजावो’ आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकऱ्यांनी दिला आहे. आंदोलनात मध्य विधानसभा अध्यक्ष प्रभाकर वायचळे, पदाधिकारी चंदन पवार, नितीन भागवत, मझिद पठाण, बंडूनाना डांगे, शैलेंद्र सिंग, सादिक अत्तार, नदीम शेख, अमोल लांडगे, अल्ताफ शेख, अनिल कौशिक, अमर गांगुर्डे, प्रदीप लोखंडे, मुझाईद शेख, तन्वीर अन्सारी, नाविंदर अहलुवालिया यांच्यासह महानगरेातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...