आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने "आपदा मित्र'' योजना राबविली जात असून या योजनेतंर्गत नाशिकमधील 500 स्वयंसेवकांना एकूण पाच टप्प्यांत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपदा मित्र योजनेचे तीन टप्पे पूर्ण झाले असून आतापर्यंत 175 स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवले आहे. तर 29 जानेवारीपासून चाैथा टप्पा नाशिकमध्ये सुरु झाला असून सहभागी युवकांना 9 फेब्रुवारीपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, आपत्ती व्यवस्थानाच्या प्रशिक्षणासोबतच सहभागी स्वयंसेवकांना 5 लाखांचा विम्याचे सुरक्षा कवचही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशभरात आपदा मित्र योजना राबविली जात आहे. प्रशिक्षित स्वयंसेवकांना भविष्यात येणाऱ्या सर्व आपदांच्या निवारण कार्यातील एक महत्वपूर्ण भूमिका निभावण्याची संधी प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर भविष्यातील अनेक कठिण प्रसंगात या प्रशिक्षणाचा लाभ होऊ शकतो. हे प्रशिक्षण विनामूल्य असून तज्ञ प्रशिक्षकांद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांसह प्रथमोपचाराची माहिती डाॅक्टरांकडून दिली जाईल. एनडीआरएफच्या तज्ञांकडून महापूर व अतिवृष्टीच्या प्रसंगी उपयोगी पडणारे प्रशिक्षण, बोटिंग, आगीच्या घटनांमधील बचावकार्य या विषयी प्रशिक्षण दिले जाणार आहेत. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे एनडीआरएफच्या तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सर्व सुविधा उपलब्ध
पोलिस अॅकडमीत 12 दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणा दरम्यान स्वयंसेवकांना अकॅडमी सोडून बाहेर येता येणार नाही. अॅकडमीमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था हॉस्टेलमध्ये करण्यात येणार आहे. विनामूल्य भोजनाची व्यवस्था देखील असेल. रोज सकाळी 6 वाजता मैदानावर हजर राहावे लागेल. यात 7.30 पर्यंत पीटी होईल. त्यानंतर 10 ते 1 प्रथम सत्र तर दुपारी 2 ते 7 द्वितीय सत्र होईल. ज्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे याचे प्रशिक्षण असेल.
अशी आहे पात्रता
वयोगट 18ते 40 असावा. इच्छूक स्वयंसेवक नाशिक जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा. किमान सातवी उत्तीर्ण असावा. तसेच शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगले असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. आपत्ती प्रतिसाद कार्यात स्वयंसेवा करण्याचा पूर्वीचा अनुभव असल्यास त्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि आधारकार्ड प्रशिक्षणावेळी आणावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.