आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये अपहरण:गंगापूरराेडवरील निवारागृहातून बालकाचे अपहरण; आठवडाभरापासून शोध लागेना!

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूररोड वरील डॉन बॉस्को शेजारील निवारा गृहात (शेल्टर) असलेल्या एका 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार 30 मे रोजी घडला. यानंतर मुलाचा शोधही घेण्यात आला पण न सापडल्याने या प्रकरणी 2 जूनला गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

बाल समितीच्या सुचनेनुसार शालेय शिक्षण व संरक्षणासाठी वास्तव्यास ठेवलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला निवारागृहात ठेवण्यात आले होते. या निवारागृहाजवळूनच मुलाचे अपहरण झाल्याचा संशय असून व्यक्त करण्यात आला ाहे.

यांसदर्भात, पेालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवारागृहाचे कर्मचारी जगदीश झरेकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कडे राहणारा सुरज (वय 12) हा आठवडाभरापुर्वी 30 मे राेजी दुपारच्या सुमारास निवारागृहातूनच बाथरूमला जावून येताे, असे सांगून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो तापर्यंत परतलेला नाही. त्याला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गंगापूर पेलिस ठाण्यता अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक एम.डी.पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. मुलगा रंगाने गाेरा, केस काळे, उजव्या डोळ्यावर जखमेचे निशाण, अंगात आकाशी निळसर रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची फुल पँट घातलेली व हिंदी भाषिक आहे. काेणाला आढळून आल्यास गंगापूर पाेलिसांशी संर्पक साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मुलाच्या शोधासाठी पोलिसांनी रेल्वे स्टेशन, बसस्थानक व मनमाड, शिर्डी भागाताही शाेध घेवूनही ताे आढळून आलेला नाही. यांसदर्भात, काहीही माहिती समजल्यास 9923810841 क्रमांकावर संर्पक साधण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...