आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबडमध्ये एका इसमाचे त्याच्या घरातूनच अपहरण करत उसनवार घेतले पैसे दिले नाही म्हणून पत्नीला फोन करत पैसे दे नाही तर तुझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडण्या विकून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कामटवाडे येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दोन इसमांसह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच पोलिसांनी वेगाने तपास करत संशयितांना सिन्नरमध्ये ताब्यात घेत इसमाची सुटका केली.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि अश्विनी भावसार रा. अभियंता नगर कामटवाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती भूषण भावसार घरी असतांना संशयित वैभव माने आणि त्याचा एक मित्र तसेच एक महिला भावसार यांच्या घरी आले. पैशांचा वाद असल्याने तीघांनी पतीला घरात शिविगाळ केली. पैसे आताच पाहिजे म्हणून बळजबरीने दुचाकीलवर बसवून ते भूषण भावसार यांना घेऊन गेले. बराच वेळ झाला पतीचा फोनही लागत नव्हता. त्यांच्या इतर मित्रांना फोन केला मात्र पतीचा ठाव ठिकाणा सापडला नाही. त्या रात्री पतीच्याच्या मोबाईलहून अश्विनी यांना फोन आला. मोबाईलवर बोलणारा संशयित वैभव माने याने फोन घेतला हाेता.
माझे ७ लाख ५० हजार अत्ताच्या आत्ता पाहिजे नाही तर तुझ्या पतीच्या दोन्ही किडण्या काढून विकून टाकेल अशी धमकी दिली. अश्विनी भावसार यांना प्रचंड धक्का बसला. नातेवाईकांना प्रकार कळवला. त्यांनी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. पोलिसांत धाव घेत त्यांनी तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य अोळखत गुन्हा दाखल करत रात्रीच तपासाची चक्रे वेगाने फिरत संशयितांचा सिन्नरपर्यंत माग काढला. संशयितांना ताब्यात घेत भूषण भावसार यांची सुटका केली. चौकशी केली असता भावसार यानंी फायनान्स कंपनीचे कार्यालाय सुरू केले असून यामाध्यमातून कर्ज काढून देत असल्याचे सांगण्यात आले. संशयितांचेही पैसे घेतले असून कर्ज प्रकरण मंजूर केले नसल्याने ते घेऊन गेल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.