आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे देत नाही म्हणून व्यक्तीचे घरातून अपहण:उसनवारीचे पैसे मागण्यासाठी महिलेला मागितली खंडणी, आरोपी ताब्यात

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या अंबड भागातून एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचे घरातून अपहरण करत उसनवार घेतले पैसे दिले नाही म्हणून पत्नीला फोन करत पैसे दे नाही तर तुझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडण्या टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कामटवाडे येथे उघडकीस आला आहे. रात्रीच पोलिसांनी तपासाचे वेगाने फिरवत संशयितांना सिन्नर मध्ये ताब्यात घेत व्यक्तीची सुटका केली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, अश्विनी भावसार (रा. अभियंता नगर कामटवाडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती भुषण भावसार घरी असतांना संशयित वैभव माने आणि त्याचा एक मित्र एक महिला घरी आले. पैशांचा वाद असल्याने तीघांनी पतीला घरात शिविगाळ केली. पैसे अत्ताच पाहिजे म्हणून बळजबरीने दुचाकीवर बसवून घेऊन गेले. बराच वेळ झाला पतीचा फोन लागत नव्हता. त्यांच्या इतर मित्रांना फोन केला मात्र पतीचा ठिकाणा लागला नाही. त्या रात्री पतीच्या मोबाईलहून फोन आला. मोबाईलवर बोलणारा संशयित वैभव माने याने फोन घेतला. माझे 7 लाख 50 हजार अत्ताच्या आत्ता पाहिजे नाही तर तुझ्या पतीच्या दोन्ही किडण्या काढून विकून टाकेल अशी धमकी दिली. हा प्रकार त्यांनी लगेच नातेवाईकांना कळवला. पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करत रात्रीच तपासाचे चक्रे वेगाने फिरत संशयितांचा सिन्नर पर्यंत माग काढला.

संशयितांना ताब्यात घेत व्यक्तीची सुटका केली. चौकशी केली असता भावसार याने फायनान्स कंपनीचे कार्यालाय सुरू केले असून यामाध्यमातून कर्ज काढून देत असल्याचे सांगण्यात आले. संशयितांचेही पैसे घेतले असून कर्ज प्रकरण मंजुर केले नसल्याने घेऊन गेल्याची माहिती संशयितांनी पोलिसांना दिली.

बातम्या आणखी आहेत...