आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोशल मीडियावर अनोळखी तरुणाशी ओळख करणे 17 वर्षीय मुलीला चांगलेच महागात पडले. या तरुणाने मुलीचे अपहरण करुन तिला थेट उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे डांबल्याचे समोर आले आहे. सुदैवाने गंगापूर पोलिसांनी आरोपीचा माग काढत मुलीची सुखरुप सुटका केली. थोडा जरी उशिर झाला असता तर मुलीची विक्री करण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अदित्य उर्फ अक्की जगतसिंग खारी (वय २१) असे या अपहरणकर्त्याचे संशयिताचे नाव आहे.
घरी डांबून ठेवले
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, २५ जुलै रोजी गंगापूररोडवरील एका गर्ल्स होस्टेलमधील मुलगी घरी जाते असे सांगून गेली होती. मात्र ती घरी पोहचली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी २७ जुलै रोजी अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुलीच्या मोबाईल नंबरच्याआधारे तीचा शोध घेतला असता ती बुलंदशहर, उत्तरप्रदेशात असल्याची माहिती मिळाली. तिच्या संपर्कात असलेला संशयिताचा माग काढला. पथकाने संशयिताला चिपटी मोहल्ला, गाव शेरपुर ठाणा, गुलहाटी येथे अटक केली. मुलीला संशयिताने त्याच्या घरी डांबून ठेवले होते. पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलीची सुखरुप सुटका केली. वरिष्ठ निरिक्षक रियाज शेख, मोतीलाल पाटील, गणेश रेहरे, संदीप पवार, रंजना गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सोशल मीडियावर ओळख
पीडीत मुलगी नंदुरबार येथील असून ती गर्ल्स होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेते. सोशल मीडियावर संशयितासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. संशयिताने पीडितेला लग्नाचे अमिष देत तिचे शहरातून अपहरण करुन तीला बुलंदशहर येथे डांबून ठेवले होते. तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.