आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवस्वराज्य दिन:छत्रपती शिवरायांवर 5 नद्यांच्या तीर्थाचा अभिषेक ; केटीएचएममध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा सोमवारी (दि. ६) शहरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती सेनेने खास गंगोत्री, यमुनोत्री, अलकनंदा, सरस्वती व गोदावरी या पाच पवित्र नद्यांचे जल आणले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास या जलाने तसेच पंचामृत व दुग्धाभिषेक करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. विधिवत पूजा करून ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा केला गेला. येथील सीबीएसजवळील स्मारकात हा सोहळा पार पडला. छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष नीलेश शेलार, तुषार गवळी, प्रदेशाध्यक्ष राजेश पवार डॉ. जयेंद्र थविल, डॉ. श्याम थविल, संदीप निगळ, श्रीकांत इशे, किशोर तिडके, धीरज खोळंबे, सनी निमसे, प्रवीण भामरे, सुनील देशमुख, कुणाल शेलार, रावसाहेब शिंदे, योगेश सोनवणे यांसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

केटीएचएम महाविद्यालयातही शिवस्वराज्य दिन साजरा झाला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे, डॉ. कल्पना आहेर, डॉ. एस. एस. पाटील, ग्रंथपाल शरद पाटील, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी उपप्राचार्य कोटमे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. महाराजांचे विचार तरुणाईला किती प्रेरक आहे हे त्यांनी पटवून दिले. राज्याभिषेक करणे का गरजेचे होते, हे स्वराज्य स्वतःचे राज्य आहे, असे प्रत्येकाला वाटत होते हा सर्व जीवनपट कोटमे यांनी उलगडला. संगीत विभागाचे प्रीतम नाकील व त्यांचा संघ यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

बातम्या आणखी आहेत...