आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवाना:सुमारे दिड हजार शिवसैनिक पदाधिकारी; जय श्रीराम नारा देत शिवसैनिक अयोध्या रवाना

नाशिकरोड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय श्रीराम, जय भवानी.., जय शिवाजी या घोषणा देत नाशिक जिल्ह्यातील सुमारे दिड हजार शिवसैनिक पदाधिकारी सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड स्थानकातून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे १५ जूनला अयोध्येचा दौरा करणार आहेत. हा दौरा संस्मरणीय करण्यासाठी कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले. शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांनी विशेष गाडीला झेंडा दाखवून प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

खासदार हेमंत गोडसे, विनायक पांडे, सूर्यकांत लवटे, योगेश गाडेकर, नितीन चिडे, कुमार पगारे, शाम खोले, किरण डहाळे, भगवान आरोटे, वैभव ठाकरे, राजू वाघसरे आदि उपस्थित होते. दरम्यान, काही कार्यकर्ते राहिल्यामुळे ओढ्याला गाडी थांबवून त्यांना नाशिकरोडहून कारने तेथे पोहोचविण्यात आले. माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले असून त्यांच्याकडे शिवसैनिकांची निवासाची व भोजनाची व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना प्रवासात पांढरे टी शर्ट देण्यात आले असून त्यावर श्रीरामाचा फोटो आहे.

बातम्या आणखी आहेत...