आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर अत्याचार:अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संशयितास पाेलिस कोठडी

सातपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रबुद्धनगर परिसरात एका पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयितास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी सातपूर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मंगळवारी (दि. १६) मुलगी घरी एकटी असताना संशयित संतोष चारोस्कर (२०) याने घरात बळजबरीने प्रवेश करत मुलीवर अत्याचार केले.

हा प्रकार समजल्यावर मुलीच्या आईने तत्काळ सातपूर पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यावरून संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अश्विनी उबाळे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...