आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्तांना शिवीगाळ:आ. बच्चू कडूंना एक वर्ष सक्तमजुरी, नाशकात दिव्यांगांच्या प्रश्नांवरून वाद

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांगांच्या प्रश्नांवरून नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांना धारेवर धरत शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना जिल्हा न्यायालयाने दाेषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठाेठावली. दरम्यान, दरम्यान, कडू यांनी वरिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.

नाशिक शहरातील दिव्यांगांसाठीचा ३% आरक्षित निधी खर्च केला जात नसल्याच्या निषेधार्थ २४ जुलै २०१७ राेजी प्रहार संघटनेने माेर्चा काढला. त्यात तत्कालीन मनपा आयुक्त कृष्णा यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करताना कडू यांनी शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सुनावणीत सरकारने कडू यांच्याविराेधात पुरावे हजर केले. शिक्षा सुनावताच कोर्ट आवारातच कडू यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...