आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध:शहरातील 9 मार्गांवर वाहनांसाठी प्रवेश बंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून दि. ३ ते ८ स्प्टेंबर या कालावधीत शहरातील ९ मार्गावर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सायंकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत हे निर्बंध लागू राहणार आहे.

या मार्गावर प्रवेश बंद : सारजा सर्कल खडकळी सिग्नल सीबीएसकडे ये-जा करणारी वाहने, दीपसन्स काॅर्नर, नेहरू गार्डन, ग.मा. पुतळा मार्गे मेनरोड बादशाही काॅर्नर, त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही काॅर्नर, गाडगेमहाराज पुतळा धुमाळ पाॅइंट, ते मंगेश मिठाई काॅर्नर, सीबीएस सिग्नलपासून शालिमारकडे व नेहरू गार्डनकडे जे-जा करणारी वाहने, मेहर सिग्नलकडून सांगली बँक सिग्नल धुमाळ पाॅइंट दहिपुलकडे ये-जा करणारी वाहने, प्रतिल लाॅजकडून नेपाळी काॅर्नर, अशोकस्तंभ कडून रविवार कारंजा मालेगाव स्टॅण्ड कडे जाणारी वाहने, मालेगाव स्टॅण्ड रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल मार्गे शालिमारकडे येणाऱ्या वाहतुकीला प्रवेश बंद राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...