आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघात:चांदवडजवळच्या राहुड घाटात चार वाहनांचा भीषण अपघात, 20-25 परप्रांतीय नागरिक जखमी

चांदवडएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिन्ही ट्रकच्या मध्ये कार आल्यामुळे कारचा चेंदामेंदा

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळील राहुड घाटात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास तीन ट्रक आणि एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघात ट्रकमधून प्रवास करत असलेले परप्रांतीय नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तिन्ही ट्रकच्या मध्ये कार आल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आहे. कारमधील प्रवाशी जखमी आहे.

करोनाच्या उद्रेकामुळे मुंबईहून उत्तर भारताच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने नागरिक आपल्या मायभूमीकडे परतत आहेत. तीन ट्रकमधून काही नागरिक प्रवास करत होते. चांदवड शहर पास केल्यानंतर पुढे राहूड घाटात एक कारचा अचानक वेग कमी झाला. यामुळे ट्रक या कारवर जाऊन आदळली. 

इतर दोन्ही ट्रक अपघातग्रस्त वाहनांना चुकविण्याच्या नादात डिव्हाईडर तोडून या वाहनांवर जाऊन धडकल्या. चार वाहने अपघात ग्रस्त झाल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बराच काळ कोलमडली होती. अपघातात जवळपास 25-25 परप्रांतिय नागरिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात गंभीर जखमींची संख्या अधिक आहे. 

अचानक झालेल्या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अखेर एका बाजूने वाहतूक सुरु करून चारही वाहने रस्त्यावर बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...