आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिक त्रस्त:बांधकाम साहित्य रस्त्यावर पसरल्याने अपघात ; इमारतींचा विकास करताना नियमांचे उल्लंघन

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील परिसरातील ४० वर्षांचे जुने बंगले व सोसायटया बांधकाम विकासकाला देत आहे. या वास्तूंचा विस्तार करताना लगतच्या रहिवासाची व रस्त्याची काळजी न घेता बांधकाम उतरवले जात असल्याने या ठिकाणी अवजड ट्रक, जेसीबी वाहनाने रस्ता उखडला जात आहे. तसेच रस्त्यावर बांधकाम साहित्य, खडी पसरल्याने अपघात होत आहे.

सेवानिवृत्तांच्या नगरातील बंगले व सोसायटीधारक सुरक्षिततेच्या व नवीन नियमाच्या दृष्टीने (डेव्हलपमेंट) विकासाच्या तत्त्वावर देत आहे. बांधकाम उतरवित असताना विकासकाने चोहो बाजूच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन बंदिस्त करावा. बाधकाम साहित्य मनपाच्या मोकळ्या जागेवर टाकू नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...