आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:देवळाली कॅन्टाेन्मेंटच्या मते ;  हा रस्ताच आहे

देवळाली कॅम्प8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅम्पमध्ये प्रवेश करतानाच कॅन्टाेन्मेंटमधील अधिकाऱ्यांच्या कारभाराचे दर्शन हाेते. देवळालीतील मुख्य रस्त्याचेच हे हाल असतील तर आतील रस्त्यांचे हाल काय असतील याची कल्पनाच न केलेली बरी. या रस्त्याबाबत नागरिक अनेक तक्रारी करत आहेत. मात्र तरीही याकडे कॅन्टाेन्मेंटचे दुर्लक्ष हाेत असल्याने कॅन्टाेन्मेंटच्या मते खड्ड्यात गेलेला ‘हा रस्ताच आहे...’ असे नागरिक उपहासाने म्हणू लागले आहेत.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देवळाली कॅम्प शहरातील प्रवेशद्वार असलेल्या हौसनरोडसह सतीश कॉम्प्लेक्सजवळील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यांची प्रचंड दैना झाली असून काेणी लक्ष देणार का असा सवाल नागरिक करत आहेत. या भागातील शहरातील प्रमुख रस्ते असलेल्या मेन स्ट्रीट, मस्जिद स्ट्रीट वडनेररोड, आनंदरोड हे खड्ड्यात गेले आहेत. कॅन्टोन्मेंटने हे खड्डे बुजवावे, १अशी मागणी जाेर धरत आहे.

मणका कामातून गेला
गड्यांमुळे गाडी खड्ड्यात गेली आणि कमरेचा व मणक्याचा त्रास उद्भवला, डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितले, आराम केला तर घर कसे चालणार?- कार्तिक बलकवडे, देवळाली कॅम्प