आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलन:94वे अ. भा. साहित्य संमेलन महामंडळानुसार होणार नोव्हेंबरमध्येच, चर्चा मात्र डिसेंबरची!

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकला हाेणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ताेंडावर आले असतानाही अद्याप तारखा आणि स्थळ याची सुरू आहे. दरम्यान महामंडळाकडून आयाेजकांना २२ आॅक्टाेबरला प्राप्त पत्रानुसार संमेलन १९ ते २१ नाेव्हेंबर या तारखांनाच घेण्याच्या सूचना असतानाही आयाेजकांमधीलच काही जणांनी संमेलन डिसेंबरमध्येच हाेणार ही चर्चा घडवून आणली. त्यामुळे संभ्रम तर निर्माण झालाच पण आता साेमवारी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ सोमवारी नक्की काेणत्या तारखा जाहीर करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संमेलन नाशिकमध्ये आपल्याला हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्याच तारखांना घ्यायचे असा चंग निमंत्रकांनी बांधला आहे. मात्र संमेलनाचे निमंत्रक तथा प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगलाताई नारळीकर यांचे नाव पुढे करत संमेलन ३, ४ आणि ५ डिसेंबर राेजी घ्यावे, असे महामंडळाला पत्र दिले हाेते. त्यावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष ठाले पाटील यांनी खरपूस समाचार घेत संमेलन नाेव्हेंबरच्या १९, २० आणि २१ या तारखांनाच हाेईल. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ या तारखा जाहीर करतील त्यावेळी आपण उपस्थित रहावे अशा सूचनाही केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...