आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय:नाशिकमध्ये 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

9 वर्षाच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार करुन तिला व तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. रवींद्र चौहलसिंग बहोत (वय 36) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांच्या न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली.

कसा घडला प्रकार

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 3 वाजता बकालवाडी​​​​​​ सार्जवजनिक शौचलयात जात असताना आरोपी रवींद्र बहोत हा तिच्या पाठीमागे गेला. तिला शौचालयात कोंडून तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत असताना आरोपीने तिच्या गालात मारून कुणास काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईवडीलांना जीवे मारेल अशी धमकी दिली.

पोक्सो अंतर्गत गुन्हा

उपनगर पोलिस ठाण्यात आरोपी बहोत याच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महिला उपनिरीक्षक एस. डी. तेली यांनी तपास केला. आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने पंच, साक्षीदार आणि फिर्यादी यांनी दिलेली साक्ष, तपासी अधिकारी यांना सादर केलेल्या पुराव्यास अनुसरुन 10 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

दहा साक्षीदार तपासले

अ‌ॅड. दीपशिखा भिडे म्हणाल्या की, या खटल्यात आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात आले होते. खटल्यात 10 साक्षीदारांच्या तपासण्या केल्या. साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले साक्षीदारांनी दिलेली साक्ष महत्तवपूर्ण ठरली.

बातम्या आणखी आहेत...