आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:पॅरोलवरील आरोपीचा ब्यूटी पार्लरमध्ये विधवेवर बलात्कार, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन महिलांच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या व सध्या पॅराेलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने ३१ वर्षीय विधवा महिलेवर तिच्याच ब्यूटी पार्लरमध्ये घुसून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२७) नाशिक येथील श्रीरामनगर पवननगर येथे उघडकीस आला. याप्रकरणी संशयित गुन्हेगार नितीन सुभाष पवार याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित विधवा महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचे निधन झाले आहे. उदरनिर्वाहासाठी ती ब्यूटी पार्लरचा व्यवसाय करते. संशयित हा तिच्या घराच्या मागे राहतो. काही दिवसांपूर्वी तो मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला आहे. संशयिताने सोमवारी अचानक पार्लरमध्ये प्रवेश करत शटर लावून घेत महिलेचे सुरुवातीला हात पाय बांधले. त्यानंतर तोडात बोळा घालून दोन तास अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...