आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्टी फर्स्ट:ड्रंक अँण्ड ड्राईव्ह मध्ये 134 मद्यपींवर कारवाई

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाने केलेल्या नाकेबंदी कारवाईत १३४ ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या केस करण्यात आल्या. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या चालकांकडून ७९ हजार १०० रुपये दंड वसूल केला. अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या ५३ केसमध्ये ७ लाख ८४ हजारांचे मद्य जप्त करण्यात आले. जुगार अड्ड्यांवर केलेल्या ७ कारवाईत १४ लाख रुपयांचा मुद्देमाल रोकड जप्त करण्यात आली. १८ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाणे, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय अधिकारी पथक, विशेष पथक, साध्या वेशातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...