आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रंक अँण्ड ड्राईव्ह:जिल्ह्यात 134 मद्यपींवर कारवाई ; 7 लाख 84 हजारांचे मद्य जप्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाने केलेल्या नाकेबंदीत १३४ ड्रंक अँण्ड ड्राईव्हसंदर्भात कारवाई करण्यात आली. मद्य िपऊन वाहने चालविणाऱ्या चालकांकडून ७९ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाऱ्या ५३ केसमध्ये ७ लाख ८४ हजारांचे मद्य जप्त करण्यात आले. जुगार अड्डयांवर केलेल्या ७ कारवाईत १४ लाख रुपयांचा मुद्देमाल रोकड जप्त करण्यात आली. १८ सराईत आरोपींना अटक करण्यात आली.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबादीत राहण्यासाठी पाेलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस ठाणे, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल, जिल्हा वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय अधिकारी पथक, विशेष पथक, साध्या वेशातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पर्यटन स्थळे, रिसाॅर्ट, हाॅटेल्स, ढाबे, माॅल्स, परिसरात गस्त करण्यात आली. महामार्ग परिसरात नाकेबंदी लावण्यात आली होती. नाकेबंदी, चेकपोस्टवर वाहनांचा तपासणी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...