आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधील 2 महा ई सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या महा ई सेवा केंद्रावर दाखल्यासाठी लूट सुरू असल्याची बातमी दिव्य मराठीने प्रकाशिक केली होती. या बातमीचा इम्पॅक्ट आज दिसून आला असून प्रांताधिकाऱ्यांकडून 2 केंद्राना 25 हजाराचा दंड सुनावला असून 6 महिने निलंबित केले आहे.
30 पट आकारले शुक्ल
हे दोन्ही महा ई सेवा केंद्र दाखल्यांसाठी शासकीय शुल्कापेक्षा 30 पटीने जास्त पैसे वसुल करत होते. या प्रकरणी प्रांतअधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदारांनी या केंद्रामध्ये बनवाट पथक पाठवित प्रत्यक्ष दाखलाच काढला. अन् पथकातील डमी उमेदवारांकडूनही पाथर्डीच्या केंद्र चालकांने उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी 200 रुपये तर म्हसरुळ परिसरातील पेठ रोडवरील दूसऱ्या केंद्र चालकाने नॉन क्रिमिलिअरसाठी तब्बल 900 रुपये आकारले. तात्काळ प्रांत अधिकाऱ्यांनी दोन्ही महा ई सेवा केंद्रावर कारवाई करत त्यांना 6 महिने निलंबित करत त्यांना प्रत्येकी २५ हजाराचा दंडही ठोठावला आहे.
दिव्य मराठीच्या बातमीची दखल
महा-ई-सेवा केंद्र चालकांनी कुणाचाही धाक नसल्यागत नागरिकांकडून विविध शासकीय, शैक्षणिक दाखल्यांसाठी जणू मनमानी पध्दतीने अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्याचा गोरखधंदाच जणू चालू केला आहे. 34 रुपये शुल्क असलेल्या दाखल्यांसाठी 200 ते 1000 रुपये आकारले जात असल्याचे वास्तव ‘दै. दिव्य मराठी’ने मांडत या केंद्र चालकांकडून नागरिकांची होणारी लुट प्रकाशझोतात आणली. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने नाशिक शहरासह तालुक्यातील 350 वर केंद्र चालकांची एकाच दिवशी विविध पथकांद्वारे तपासणी केली. त्यात 113 केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आली. कुणी दर्शनी भागात दर फलक लावले नव्हते, कुणी नोंदवही अद्यावत केलेली नव्हती. कुठले सेंटर सोयीनेच उघडले जात असल्याचेही आढळून आले.
डमी उमेदवारांने पोलखोल
शिवाय शासकीय शुल्कापेक्षा 30 पटीने पैसे आकारले जात असल्याच्याही तक्रारी यापुर्वी झाल्या असल्याने या पथकांनी डमी उमेदवार धाडून दाखले काढले असता त्यांच्याकडूनही वाढीव पैसे उकळल्याचे स्पष्ट झाले. म्हसरुळ पेठरो़ड परिसरातील रोहण हरिश्चंद्र अग्रवाल यांच्या सीएससी केंद्रांची तपासणी तलाठी मनिषा पाटील यांनी तपासणी केली. नॉन क्रिमिलिअरसाठी 900 रुपये केंद्र चालकाने घेतल्याचा अहवाल दिला. तर पाथर्डी फाटा येथील समर्थ ई-सेवा- केंद्र चालकाने मंगेश टीळे आणि अस्मिता तासकर यांच्याकडून उत्पन्न दाखल्यांसाठी 34 रुपयांऐवजी 200 रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही ग्राहकांनी जबाब देताना पावत्या दिल्या नसल्याचे सांगितले.
या केंद्रावर तपासणीत गंभीर दोष आढळून आले. या दोन्ही केंद्राचालकांकडून उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी 200 ते 300 अन् अग्रवाल यांच्या केंद्रात नॉन क्रिमिलिअरसाठी तब्बल 900 रुपयांची मागणी तहसीलदारांच्या डमी उमेदवाराकडेच कऱण्यात आली. बनवाट ग्राहकांच्या माध्यमातून भांडाफोड झाल्यानंतर दोन्ही केंद्र प्रांताधिकारी नीलेश श्रींगी यांनी 6 महिने निलंबित करण्यासह 25 हजार रुपयांचा प्रत्येक दंडही आकारला आहे. त्याचा भरणाही आदेशाच्या दिवसांपासून 4 दिवसांत करण्याचे आदेशित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.